Marathi News

सोनी मराठीवर होणार ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

 

शालेय जीवनात दंगा-मस्ती केलेले बॉईज कॉलेजमध्ये काय कल्ला करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी बॉईज ला प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. कलाकारांचाअभिनय, त्यांचे डायलॉग्स आणि गाण्यांमुळे बॉईज  सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जापुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठीने आतापर्यंत अनेक मालिकांतून प्रेक्षकांची अभिरुची जाणली आहे आणि आता सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दाखवून प्रेक्षकांचा विकेंडही स्पेशल बनवत आहेत. पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि सुमंत शिंदे यांचे कॉलेज पुराण असलेल्या बॉईज  सिनेमात आताची पिढी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत अथवा त्यांच्या अवतीभोवती जे काही घडते तीपरिस्थिती मांडली आहे. जसे की इंटरनेटचा अयोग्य वापर. तसेच मुलांना न रागवता त्यांच्या कलेने त्यांना समजून सांगितले पाहिजे हा संदेश यातून देण्यात आला आहे.

इरॉस इंटरनॅशनलएव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अवधुत गुप्ते प्रस्तुतलालासाहेब शिंदेराजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित ‘बॉईज  सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. यंगबॉईजसह शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत.

शाळेतली दंगा-मस्ती संपवून, कॉलेजमध्ये राडा सुरु करणा-या बॉईज चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहा रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ फक्त फक्त सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button