Marathi Trends

‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय

 

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर कशी तू’ नुकताच लाँच झाला. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित ‘बेखबर कशी तू’ ह्या म्युझिक अल्बमच्या लाँचला सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव उपस्थित होते.

अल्बम लाँच झाल्यावर फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “बेखबर कशी तू गाणे पाहिल्यावर ते पून्हा पून्हा पाहत राहावेसे वाटते. मराठी सिनेसृष्टीत किती प्रतिभावान युवा कलाकार आहेत, हे ह्यावरून सिध्द होतं.”

गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या ‘बेखबर कशी तू’ गीताला संगीतकार व्यान याने संगीतबध्द केले आहे. आणि रॉकस्टार रोहित राऊतने हे गाणे गायले आहे, लाँच झाल्याझाल्या चोवीस तासातच गाण्याला 80 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले तर गाणे सातव्या स्थानी युट्यूबवर ट्रेंडिंग होते.

ह्या अल्बमविषयी ‘व्हिडियो पॅलेस’चे नानुभाई जयसिंघानी म्हणाले, “अवघ्या चोविस तासात अल्बमला ऐंशी हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळणे, ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. श्रवणीय संगीत, अप्रतिम लोकेशन्स, आणि उत्तम कलाकार ह्यासर्वाची एकत्रितपणे काय जादू रसिकांवर होऊ शकते, हे बेखबर कशी तू गाण्याने दाखवले, ह्याचा मला अभिमान आहे. “

‘सेवन सिझ मिडिया’चे डायरेक्टर आणि ‘बेखबर कशी तू’ गाण्याचे निर्माते समीर परब म्हणाले, “सेवन सिझ मीडियाचा हा पहिला मराठी म्युझिक अल्बम आणि त्याला रसिकांकडून मिळालेली कौतुकाची पावती आम्हांला आता अजून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करायची प्रेरणा देते आहे. ह्या क्षेत्रातल्या नानुभाईंसारख्या जाणकारांमूळे आणि गुणी कलाकारांची साथ लाभल्यामूळे सेवन सिझला हे यश मिळाले आहे. “

 म्युझिक अल्बमचा दिग्दर्शक ओंकार माने म्हणतो, “संगीतकार व्यानच्या सुमधूर संगीताला रोहित राऊतचा स्वरमयी साज आणि त्याला असेलेली सुमेध-संस्कृतीच्या ऑनस्क्रिन रोमँसची जोड ह्यामूळे हे गाणे युवापिढीला आवडत असल्याच्या प्रतिक्रिया सध्या आम्हांला मिळत आहेत.”

रॉकस्टार गायक रोहित राऊत म्हणतो, “हा माझा पहिला अल्बम आहे, ज्याला चोविस तासात एवढी भरघोस प्रतिक्रिया मिळाली आहे. मी रसिकांचे आभार मानतो.”

अभिनेता सुमेध मुदगलकर  म्हणाला, “आमच्या म्युझिक अल्बमला मिळालेले हे यश संपूर्ण टिमचे आहे. अतिशय प्रतिकुल वातावरणात संपूर्ण टिमने खूप मेहनतीने गाण्याचे चित्रीकरण केले होते. आमची मेहनत फळाला आली, असं मला वाटतं.”

अभिनेत्री संस्कृती बालगुडे म्हणाली, “डेहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण झाले आहे. प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं, असे एक सुंदर गाणं आपल्यावर चित्रीत व्हावं. आणि रसिकांकडून त्या गाण्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळावा. माझं हे स्वप्न आज पूर्ण झालं.”

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button