पुष्कर जोगच्या ती & ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच
जबरदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा पुष्कर जोग आपला नवा सिनेमा ती & ती च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारी घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये “ती & ती” मध्ये अडकलेला पुष्कर आपल्याला दिसतो.
अभिनेत्याबरोबरच निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर आपल्या या निर्मितीविषयी बोलताना, “आपल्याला बाहेरगावी चित्रीत होणा-या चित्रपटांची प्रचंड आवड असल्याचं म्हणाला. पुढे बोलताना, “एक निर्माता म्हणून ती अॅ॑ड ती च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये दिसणारी श्रीमंती मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केल्याचं त्याने स्पष्ट केलं.” तर चित्रपटाची कथा खूप सुंदररित्या लिहिली गेली असून यात प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची भूमिका साकारताना धमाल आल्याचं म्हणत प्रेक्षकांना हा गोंधळ नक्की भावेल, असा विश्वास पुष्कर जोग यांनी दर्शव आहे.
‘ती’ असताना ‘ती’च्या येण्याने गांगरलेल्या तरूणाची ही कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली असून मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया निर्मित या चित्रपटाची निर्मिती पुष्कर जोग आणि मोहन नाद्दर यांनी केली असून मोहित छाब्रा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर ती & ती च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांभोवती फिरणारी ही कथा लवकरच आपल्या सगळ्यांना कन्फ्युज करायला येणार आहे