Marathi News

निळकंठ मास्तरच्या निमित्ताने पूजाचं नृत्यदिग्दर्शनात पदार्पण

 

IMG_0164

स्वातंत्र्यसेनानींच्या प्रेमबंधांवर भाष्य करणारा निळकंठ मास्तर 7 ऑगस्ट ला प्रदर्शित झाला आहे. एक वेगळा विषय या निमित्ताने प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. यापूर्वी स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष, त्यांना करावा लागणारा त्याग याविषयीचे किस्से बऱ्याच सिनेमांमधून आपल्यासमोर आले मात्र या वीरांच्या प्रेमकथा नेहमीच दुर्लक्षित राहिल्या आहेत. याचं प्रेमकथांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेचं कोझी होम्स प्रस्तुत आणि अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड निर्मित निळकंठ मास्तर…

निळकंठ मास्तर हा सिनेमा बऱ्याच अंशी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन, अजय-अतुल या सुप्रसिध्द जोडगोळीचं सुमधूर संगीत, कलाकारांचा अप्रतिम अभिनय, निरनिराळ्या प्रदेशांमध्ये केलेलं नेत्रदिपक छायाचित्रण या सगळ्याचं पार्श्वभूमीवर हा सिनेमा वेगळा ठरतो. यातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पूजा सावंतचं नृत्यदिग्दर्शन… पूजाला आपण एक सक्षम अभिनेत्री म्हणून ओळखतो मात्र निळकंठ मास्तरच्यानिमित्ताने ती एक नृत्यदिग्दर्शिका म्हणून आपल्या समोर आली आहे….अधिर मनं या गाण्यासाठी गजेंद्र अहिरेंच्या साथीने पूजाने नृत्यदिग्दर्शनात पदार्पण केलयं. या गाण्यात ती आपल्याला खेळताना, बागडताना दिसते आहे.

नृत्यदिग्दर्शनाबरोबरचं आपल्या सुंदर अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा पूजाने दाखवली आहे. एक खोडकर, खेळकर मुलगी ते मनाविरूध्द झालेली इनामदारांची सून हा इंदू या व्यक्तीरेखेचा प्रवास पूजाने अप्रतिम साकारला आहे. इंदू म्हणून तिचा खोडकरपणा जितका मनाला भावतो…..इनामदारांच्या सूनेचा रूबाबही त्याचं ताकदीचा वाटतो. आपण निळकंठ मास्तरच्यानिमित्ताने पहिल्यांदाचं पूजाला एका गावरान मुलीच्या रूपात पाहणार आहोत. हा तिचा लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीला पडतो हे येणारा काळचं सांगेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button