मॉडेल अझर खान एक बॉलिवूडचा नवा चेहरा बनणार आहे. यासाली अझर डेब्यू युवा कलाकारांपैकी एक असणार आहे. फॅशन मॉडेल अभिनेता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा ‘सीज़नस ग्रीटिंगस’ चे नुकतेच सेलिना जेटलीसोबत शूटिंग पूर्ण झाले आहे.
राम कमल मुखर्जी दिग्दर्शित ‘सीज़नस ग्रीटिंगस’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असून चित्रपट ज्येष्ठ चित्रपट निर्माते रितुपर्णो घोष यांना श्रद्धांजली आहे.
सेलिना जेटलीसोबत काम करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अनुभव आहे. आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला खूप मजा आली. कोणत्याही अभिनेत्याला इतक्या मोठ्या मोहिमेद्वारे संधी मिळविणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे.” अभिनेता अझर खान म्हणाला.