Marathi News

MIRANDA HOUSE : वेलकम टू ‘मिरांडा हाऊस’

MIRANDA HOUSE
MIRANDA HOUSE
‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाच्या रहस्यमयी पोस्टर नंतर आता या चित्रपटाचा अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलर वरून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. पल्लवी सुभाष तिचा पहिला संवाद ‘नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा’ म्हणताना तिच्या डोळ्यातील  आणि चेहऱ्यावरील अविर्भाव यातच तिचे अभिनयकौशल्य दिसते. चित्रपटाचा ट्रेलर बघताना जे संवाद कानी पडतात त्यावरून चित्रपट पंचमहाभूतांवर तयार केलेल्या चित्रांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रहस्यांची उकल होतांनाही यात दिसणार आहे. ‘वेलकम टू माय हाउस’ हा संवाद ऐकताच मिलिंद गुणाजी यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहापर्यंत नेईल यात वाद नाही. साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्याला आतापर्यंत आपण हलक्या फुलक्या भूमिकेत पहिले आहे. त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साईंकित या चित्रपटात साकारत आहे.
मुळातच मराठीमध्ये ‘सस्पेन्स’ या वर्गात बसतील असे चित्रपट कमी येतात. त्यामुळे असे उत्सुकता शिगेला नेणारे आणि वेगळ्या साच्यातले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडतात. या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील कलाकार. मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत यांच्यासारखे कसलेले कलाकार आणि हटके विषय यामुळे हा चित्रपट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनत आहे. बऱ्याच दिवसांनी मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
१९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेंद्र तलक यांनी केले असून  आयरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी  ‘अ रेनी डे’, ‘सावरिया. कॉम’, ‘सावली’ हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ‘मिरांडा हाऊस हा चित्रपट मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.

https://youtu.be/w6OlAPR87hc

Related Articles

Leave a Reply

Back to top button