Marathi News

‘उरी’ सिनेमाच्यामूळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर लोकप्रियतेत विकी कौशल ठरला अग्रेसर !!!

Vicky Kaushal Score Trends Ranking

 

विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही वाढता जोश दिसून येतोय. 2018मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामूळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आला. पण 2019मधल्या उरी चित्रपटाने तर कमालच केली. विकी कौशल रातोरात स्टार झाला.

यंदा 11 जनवरीला रिलीज झालेला बॉलीवूडचा हा ह्यावर्षीचा बॉक्स ऑफिसवर झळकलेला पहिला सिनेमा संपूर्ण महिनाभर बॉक्स ऑफिसवर आपली चांगली घोडदौड करत होता. ह्याचा अर्थातच फायदा विकीच्या लोकप्रियतेत झाला. 2019च्या सुरूवातीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत 34 व्या स्थानी असलेला विकी आता 6 व्या स्थानावर पोहोचलाय.

स्कोर टेंड्स इंडियाच्या गेल्या 45 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, 3 जानेवारी 2019ला विकी कौशल 34व्या स्थानावर होता. तर उरी चित्रपटाच्या रिलीजच्या आठवड्यात म्हणजेच 10 जानेवरी ते 17 जानेवारीच्या आठवड्यात पांचव्या स्थानावर पोहोचला होता. ज्यानंतर त्याच्या  लोकप्रियतेत बरेच उतार-चढाव दिसले. त्यानंतर पून्हा 14 फेब्रुवारीच्या आठवड्यात उरी सिनेमाला मिळालेल्या बॉक्स ऑफिस रिस्पॉन्समूळे विकी लोकप्रियतेत 6 व्या स्थानावर आला.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या उरी फिल्ममूळे त्याच्या यशात आणि चाहत्यांच्या प्रेमात एवढी वाढ झाली की, त्याच्याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डिजीटल न्यूज आणि प्रिंट न्यूजमध्ये खूप लिहीलं आणि चर्चिलं जातं होतं. गेल्या वर्षी आलेल्या सिनेमांमूळे विकी कौशल एक चांगला अभिनेता आहे, हे सिध्द झालंच होतं. पण 2019 वर्षाने विकीला स्टारपण बहाल केलं, असं म्हणावं लागेल. “

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button