स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान

Spruha Joshi

 

स्पृहा जोशीची ओळख संवेदनशील अभिनेत्रीसोबतच संवेदनशील कवयित्री अशीही आहे. स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. 1 मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

स्पृहा जोशी म्हणते, “मी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर गावात मी श्रमदानासाठी गेले होते. आणि माझ्या श्रमदानातल्या त्या चांगल्या अनुभवानंतर माझ्या आई आणि काकू दोघींनीही यंदा माझ्यासोबत धमदानात सहभागी व्हायचं ठरवलं. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या पाणी फाउंडेशनच्या मोहिमेत मला सहभागी होता येतंय, याचं मला समाधान वाटतंय. महाराष्ट्ला सुजलाम सुफलाम करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचा आनंद आगळाच आहे.”

Exit mobile version