सई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय

Sai Tamankar – Dhurala Marathi Movie

नव्या वर्षात सध्या ‘हव्वा’ फक्त अभिनेत्री सई ताम्हणकरचीच होताना दिसतेय. ‘धुरळा’ सिनेमातल्या दमदार अभिनयाने सई ताम्हणकरने 2020ची सुरूवात धमाकेदार केल्यावर आता सई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय.

महाराष्ट्रात 3 जानेवारीला धुरळा सिनेमा झळकताच सर्वत्र सई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयाची चर्चा सुरू झाली. आता महाराष्ट्रानंतर हा सिनेमा इतर देशांमध्येही रिलीज होणार आहे. आणि कतारमध्ये धुरळा सिनेमाच्या प्रिमीयरसाठी अभिनेत्री सई ताम्हणकर स्वत: पोहचणार आहे.

सूत्रांच्यानूसार, सई ताम्हणकर ही एकमेव अभिनेत्री आहे, जी मराठी सिनेमाची आंतरराष्ट्रीय आइकन आहे. तिची ग्लोबली फॅनफॉलोविंग आहे. त्यामूळे कतारला सिनेमा पोहचताना तिथल्या सिनेरसिकांकडून सई ताम्हणकरला उपस्थित राहायचे आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आणि त्या विनंतीला मान देऊन सई कतारला जाणारे आहे.

ह्याविषयी सई ताम्हणकर म्हणाली, “ प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, त्याचे काम जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे. आणि महाराष्ट्रातल्या रसिकांची दाद मिळवल्यावर आता इतर देशांमधल्या प्रेक्षकांपर्यंतही आमची फिल्म पोहचणार आहे. आम्हा प्रत्येक कलाकाराला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलीय. त्यापैकी कतारच्या प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलीय, ह्याचा खूप आनंद होतोय. आता कतारच्या माझ्या चाहत्यांना धुरळाच्या निमित्ताने भेटण्याची संधी मिळतेय. त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचवण्याची आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीय.”

Exit mobile version