पोश्टर गर्लचा ( Poster Girls) टीझर लॉँच संपन्न!
12 फेब्रुवारीला पोश्टर गर्ल प्रदर्शित होतोय अशी बातमी सर्वत्र पसरल्यापासून या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचं गोड फळ त्यांना मिळालं झी टॉकीज आयोजित महाराष्ट्राचा फेवरेट कोण? च्या मंचावर, जेव्हा या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या अनुशंगाने जाणारं सादरीकरण केलं.
मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि तिचे सहकलाकार जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन आणि हेमंत ढोमे हे या सादरीकरणाचा भाग होते. या छोटेखानी सादरीकरणानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शमवणारा टिझर लॉँच करण्यात आला. हा टीझर लॉँच चित्रपटातल्या कलाकारांबरोबरच दिग्दर्शक समीर पाटील आणि निर्माते पुष्पांक गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉँच झाल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांच्या ओठावर बसलेली पोश्टर गर्ल ची टॅगलाइन ‘संपूर्ण गावासाठी येकच बस’ नंतर आता या चित्रपटातली रूपाली ‘फक्त नाव लक्षात ठेवायचं’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें निर्मित ‘पोश्टर गर्ल’ येत्या 12 फेब्रुवारीला तुमच्या भेटीला येत
वायकॉम18 मोशन पिक्चर्स फिल्म – वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें निर्मित ‘पोश्टर गर्ल’