मुंबई : वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित पोश्टर गर्ल हा सिनेमा 12 फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच, पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’… या गाण्याच्यानिमनित्ताने प्रथमचं मराठीतही DJ ने प्रवेश केलायं. शिवाय, नवीन पोपट हा म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे, ‘आनंद शिंदे’ आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत याचं क्षेत्रात करीअर करण्याचा ध्यास घेऊन तरूणाईला आपल्या आवाजाने भूल घालणारा त्यांचाच सुपुत्र ‘आदर्श शिंदे’ यांची जोडी सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर येते आहे. या दोघांवर प्रेक्षक गेली कित्येक वर्ष प्रेम करत आहेत. तितकचं प्रेम या गाण्यावर होताना दिसत आहे.
सध्या पार्टीज् मध्ये हे गाणे खूप वाजत आहे. DJ ला आईची शपथ देऊन त्याच्या तालावर तरूणाईची पाऊलं थिरकताना आपल्याला दिसत आहेत.
वरात जोमात म्हणत गावाला कोमात पाठवणाऱ्या या DJ चे शब्द क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेत. तर या उत्तम शब्दमांडणीला संगीत दिले आहे अमितराज यांनी…
बाप-लेकाच्या या जोडीने दिलेले हे गाणे पार्ट्यांना नवा रंग भरण्यात यशस्वी होईल, यात शंका नाही.