पुर्वी भावेचे पहिले डान्स कवर झाले रिलीज, केला ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर डान्स
‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ह्यात अनेंक बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामिल आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. आणि मालिका आल्यावर ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडीयोज अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले.
अभिनेत्री-नृत्यांगना पुर्वी भावेही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती आहे. तिने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे ह्या मालिकेला मानवंदना दिली आहे.
पुर्वी भावे सांगते, “मी गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची खूप मोठी चाहती आहे. ‘ग्रेम ऑफ थ्रोन्स’चे टायटल थीम ट्रॅक कुठेही ऐकले की लगेच माझे कान टवकारले जातात. ह्या थीम साँगवर मी मनातल्या मनात मालिका पाहताना खूपदा कोरीओग्राफीही केली होती. आणि शेवटच्या सिझनची घोषणा झाल्यावर गेले काही दिवस ब्रेक ऑफ रिएलिटी’ गाणे माझ्या मनात रूंजी घालत होते.“
ती पूढे सांगते, “मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज यृट्यूबवर घेऊन येण्याचे प्लॅन करत होते. मग मनातं आलं, की, ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ ह्या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम साँगच्या वर्जनवर पहिलं कवर करावं. आणि मग ह्या कल्पनेला सत्यात उतरवलं.”
पुर्वी म्हणते, “शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटलं पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवड्यामागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी ह्यावर खूप सुंदर मुंद्रा आहेत. ह्या नृत्यशैलीतून ड्रगन, व्हाइट वॉकर्स ह्यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडल्या जाऊ शकतात. “