उन्हाळा म्हंटला कि सर्वत्र वेध लागतात ते आंब्याचे…अस्सल आंब्याचा सुगंध आणि त्याची चव चाखण्याची मज्जाच काही औरच असते! मराठीची ग्लॅमर्स अभिनेत्री नेहा महाजन हिला देखील हा मोह आवरता आला नाही. दादर येथे सुरु झालेल्या आंबा महोत्सवाचे उद्गाटन तिच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात आलेल्या मुंबईकरांसोबत नेहाने आंब्यांचा मनसोक्त आनंद लुटला.