Lucky Movie : संजय जाधव ह्यांची मल्टिस्टारकास्ट ‘लकी’?
सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट.
‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेले एक महिना प्रॉडक्शन हाऊसकडून स्टारकास्टची रिविल झाली नव्हती.
फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनुसार, लकीने फिल्म इंडस्ट्रीसह सिनेरसिकांचीही गेले एकमहिना एवढी उत्सुकता ताणून धरली होती. असे फक्त बॉलीवूड सिनेमांबाबतच होते. गेला एक महिना ह्या सिनेमाची स्टारकास्ट कोण असेल? ह्याविषयी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती. आणि मग अचानक सोशल मीडियावर एकामागून एक ए-लिस्टर सेलेब्सचे पोस्ट पाहायला मिळाले.
पहिल्यांदा उमेश कामत, मग सिध्दार्थ जाधव, त्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा ए-लिस्टर मराठी सेलेब्सनी तेच ‘लकी’ असल्याचं म्हटलं.
सूत्रांनुसार, एवढी तगडी स्टारकास्ट एका सिनेमात पाहायला मिळणं हा तर दुग्धशर्करा योग. आणि एवढ्या कलाकारांना एका सिनेमात आणणं फक्त संजय जाधवच करू शकतात. असा मल्टिस्टारर सिनेमा पाहणं, ही तर सिनेरसिकांसाठी पर्वणीच असेल. रोज ह्या सिनेमाविषयी फिल्मइंडस्ट्रीतले एक-एक मोठमोठे सेलेब्स ते लकी असल्याचे सोशल मीडियाव्दारे सांगत आहेत.
लकीच्या स्टारकास्टची अनाउन्समेन्ट ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ लवकरच 7 सप्टेंबरला करणार आहे. पण तोपर्यंत ह्या बिगबजेट आणि मोस्ट अवेटेड सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अजून कोण कोण सामिल होते आहे. ते सोशल मीडियावरून कळेलच.