Marathi News

हेमंत ढोमे म्हणतोय ‘आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’

ANIKET VISHWASRAO
ANIKET VISHWASRAO

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर याच सिनेमातील दुसरे हळदीचे गाणे प्रदर्शित होत आहे. लग्नाच्या आधी होणाऱ्या हळदीच्या समारंभातील हे गाणं धमाल, मस्तीने पुरेपूर असे पार्टी सॉंग आहे.
या गाण्याने चित्रपटाची सुरुवात होत असल्याने हे हळदीचे गाणे धमाकेदार असावे, अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. या इच्छेला योग्य न्याय देत गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज यांनी जोरदार गाणे तयार केले, तर नागेश मोर्वेकर यांनी या गाण्याला स्वरबद्ध करत त्यावर साज चढवला.

नेहा महाजन, अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे प्रत्येकालाच थिरकायला लावणारे आहे. या गाण्याबद्दल सांगताना दिग्दर्शक सांगतात, म्युझिक सिटींग साठी आमची टिम एकत्र बसली होती, गाण्याबद्दल विचार चालु असताना क्षितिजला ‘आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी’ असे हटके आणि सहज तोंडात बसणारे शब्द सुचले आणि याच शब्दांचा आधार घेत हे हळदीचे गाणे तयार झाले. मी या गाण्यातल्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होतो. शेवटपर्यंत मला पाहिजे तशी व्यक्ती मिळाली नाही. मग ही भूमिका मीच करावी, असे सर्वांनी मला सुचवले. आणि मी तयार झालो. हे गाणं ऐकताना नक्कीच सगळ्यांना ठेका धरायला लावेल यात शंका नाही.”

टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button