Chandrakor Movie 2015
Chandrakor Marathi Movie 2015 :
राजेश जाधव दिग्दर्शित चंद्रकोर हा सिनेमा नुकताच महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला . जितु गोस्वामी या नवोदित कलाकाराने या सिनेमाच्या निमिताने मराठी सृष्टीत पदार्पण केलय . मनिषा केळकर आणि जितु गोस्वामी हि एक ताजी जोडी या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे . चितशक्ती पिक्चरच्या मीना खंडाळे तसेच राजेश विठ्ठलानी हे पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय . निर्मिती बरोबरच मीना यांनी या सिनेमाची गीते हि लिहिली आहेत . कवी राम कदम फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट गीतकार म्हणून प्रदान करण्यात येणारा ‘तापी-पूर्णा पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. त्याचसोबत ५४व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनातही उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना या सिनेमासाठी मिळाला आहे.
मनिषा केळकर, जितु गोस्वामी यांच्यासोबतच उदय सबनीस, जयराज नायर, गणेश यादव, प्राजक्ता केळकर, होनाजी चव्हाण, अशोक पाडवे, मीना सोनावणे, राजेश उबाळे या कलाकारांच्या भूमिकाही या सिनेमात पाहायला मिळणार आहेत या सिनेमात एकूण पाच गाणी असून विजय गटलेवार यांनी या गाण्यांना संगीत दिल आहे सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, साधना सरगम, जयश्री करंबेळकर, विजय गटलेवार आणि मिलिंदशिंदे यांच्या आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आलीआहेत.
लावण्याची चंद्रकोर या कादंबरीवर आधारित असलेला या सिनेमाची कथा ही निंबाजी हिवरकर यांनी लिहिलेली असून पटकथा-संवाद शरद दोरके यांनी लिहिलेले आहे.
Teaser: