Marathi News

निलंबरी बसमध्ये झाला ‘बसस्टॉप’ चा हटके टिजर पोस्टर लाँच

मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित ‘बसस्टॉप’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आला. बिनछताच्या ‘निलांबरी’ बसमध्ये ‘बसस्टॉप’च्या संपूर्ण टीमने एकत्र येत सिनेमाचा टिजर पोस्टर लाँच केला, एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली. एकतर ‘माय वे’ नाहीतर ‘हाय वे’ हा या टिजर पोस्टरवरील स्लोगन आजच्या तरुणाईंची बिनधास्त विचारसरणी व्यक्त करण्यास पुरेसा ठरत आहे. तसेच त्यावर पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव,अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आणि हेमंत ढोमे हे चेहरे दिसत असून त्यांच्या चित्राखाली बोल्ड, बीजी, रोमान्स, एपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील विविध जीवनशैली मांडणारे शब्द देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा टिजर पोस्टर प्रथमदर्शनी पाहताना ‘बसस्टॉप’ हा सिनेमा आजच्या लाईफ स्टाईलवर भाष्य करतो, असा अंदाज येतो.
BUS STOP' TEASER POSTER LAUNCHED
गणराज असोशिएट्स प्रस्तुत ‘बसस्टॉप’ या सिनेमाच्या निर्मितीमध्ये पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांचीदेखील महत्वाची भूमिका आहे. या सिनेमाच्या टिजर पोस्टरवर आजच्या देखण्या आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचे चेहरे जरी दिसत असले तरी, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांची देखील यात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीचा नवा आयाम मांडणारा ठरणार आहे.  यासर्व मल्टीस्टाररचा “बसस्टॉप’’ सिनेमा येत्या २१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button