सोनी मराठीवर 11 मार्चपासून सुरू होणार बाबांच्या राजकन्येचा प्रवास
राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ‘ती‘ राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते – कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.
21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य