Marathi News

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ ची वाढणार आतुरता; नुकतेच प्रदर्शित झाले पुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’ चे मोशन पोस्टर

Ti And Tiमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेचडिजीटल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण काही दिवसां अगोदरच रिलीझ झालेल्या याचित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम सादर करत आहे ‘ती & ती’ चे मोशनपोस्टर.

या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे. पण चित्रपटाची कथानेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल तयार झाले असेल. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपटआहे, त्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता अनेकांना हमखास असणार.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, आनंदपंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

प्रेमाचा लव्ह ट्रँगल, एक आगळी-वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्कीउर्फ पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती & ती’ साठी खूपच जास्त आतुर झाले आहेत. भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती &ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

https://www.instagram.com/p/BspMkv1FIlC/

Related Articles

Leave a Reply

Back to top button