Marathi News

सईच्या आयुष्यावरची थरारकथा ‘डेट विथ सई’

Date With Saie Poster

 

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए-लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच डेट विथ सई ह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

 

डिसेंबरपासून सुरू होणा-या ह्या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ह्या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांच्या अनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

 

ह्या सूत्रांच्या अनुसार, ह्या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

सई ताम्हणकर म्हणली, “डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणा-या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button