लकीसाठी बप्पीदांचा golden voice.. बप्पी लाहिरी पहिल्यांदाच मराठी पार्श्वगायनात
आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ ह्या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे.
नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्
रेकॉर्डिंग झाल्यावर बप्पीदांचा भरभरून आशिर्वाद मिळालेला संगीतकार अमितराज म्हणाला, “माझ्या करीयरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठी भेट असते.”
बप्पी लाहिरी म्हणाले, “मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडते. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो. “
ते पूढे सांगतात, “ मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. तरीही 1990 ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधव ह्यांच्या सिनेमामूळे मी मराठीत परत येऊ शकलो. अमितराजने गाण्याला दिलेली चाल मला आवडली. पटकन ओठांवर रूळेल, असे हे गाणे आहे. लकी सिनेमासाठी संजय जाधव ह्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा”
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणे गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातले खुप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाव्दारे आम्ही मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतोय, ह्याचा अभिमान वाटतोय”
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स‘ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन‘ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी‘ लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.