#YaariChiSelfie प्रमोशनसाठी प्रियंकाचा नवा फंडा
नव्या पिढीला सतत नाविन्याची ओढ असते. आजच्या सेल्फीच्या जमान्यात सेल्फीमय झालेल्या ह्या पिढीत आता प्रियंका चोप्राचं नाव देखील आवर्जून घेतलं जात आहे. नुकतंच प्रियंका चोप्राने तिच्या ट्विटर अकाऊंट वरून #yaarichiselfieपोस्ट करून आपल्या चाहत्यांनाही त्यांची #yaarichiselfieतिच्यासोबत शेअर करायला सांगितली आहे.
याला कारण म्हणजे पर्पल पेबल पिक्चर्स यांचा आगामी सिनेमा ‘काय रे रास्कला‘ या चित्रपटाचं “यारी ची दोस्ती” हे गाणं… लवकरचं शान आपल्या मधुर आवाजात ह्या गाण्याद्वारे सर्वांना आपल्या मैत्रीची आठवण करून देऊन सगळ्यांनाच आपली #yaarichiselfie शेअर करायला भाग पडणार आहे.
छोटा पॅकेट बडा धमाका गुड्डू म्हणजेच निहार गीते आणि राजा म्हणजेच गौरव घाटणेकर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधू चोप्रा यांनी केली असून डॉ. सत्यशील बिरादर आणि संगीता मांजरेकर सहनिर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. तर कुनिका सदानंद यांनी कार्यकारी निर्मातीची भूमिका बजावली आहे. या चित्रपटात गौरव आणि निहार बरोबरच भाग्यश्री मोटे, निखिल रत्नपारखी, सुप्रिया पठारे, अक्षर कोठारी, श्रीकांत मस्की या कलाकार मंडळी आणि ऐश्वर्या सोनार हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. तर गुड्डू च्या भूमिकेत दिसणारा निहार या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करणार आहे.
रोहन-रोहन या संगीतकार जोडीने ही #yaarichiselfieसंगीतबध्द केली आहे. शान च्या आवाजाने सजलेली ही selfieगिरिधरन स्वामी दिग्दर्शित ‘काय रे रास्कला’ चित्रपटाच्या निमित्ताने येत्या 14 जुलै ला आपल्या भेटीला येणार आहे.