Marathi News

स्टार प्रवाह’ची नवी रोमँटिक कॉमेडी मालिका  सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

adrr-logo
अपोझिट्स अट्रॅक्ट् असं म्हटलं जातं आणि तसं झालं की होतं एक फ्रिक्शन आणि त्यातून उमलते एक गोड प्रेम कहाणी ! स्टार प्रवाहवर ‘आम्ही दोघं राजा राणी’ या मालिकेतून अशीच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. येत्या  १४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता ही मालिका सुरू होत आहे.

पार्थ आणि मधुरा दोघं आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या त्यांचे आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे नमुनेदार कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. अतिशय मनोरंजक असं कथानक तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी ही रोमँटिक कॉमेडी मालिका आहे.

संगीता राकेश सारंग यांच्या ‘कॅम्सक्लब’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी  कलाकार यातील भूमिका साकारत आहेत.

‘विकता का उत्तर’ हा हटके गेम शो, ‘गोठ’,‘ग….सहाजणी’ आणि ‘नकुशी… तरीही हवीहवीशी’ या तीन मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ‘आता थांबायचं नाय’ म्हणत ‘स्टार प्रवाह’ उत्तम आशय आणि निखळ मनोरंजनासाठी ‘आम्ही दोघं राजा राणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.त्याचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील असा स्टार प्रवाह वाहिनीला विश्वास आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button