“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.
सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्याच्या मैफलीत आजवर कित्येक कलावंतांनी हजेरी लावली. या आठवड्यात असाच एक कलावंत या मंचाची शोभा वाढवणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आखरी पास्ता हे कॅरेक्टर बरेच फेमस आहे. “I am a joking” म्हणत सर्वांची भंकस करणारे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चंकी पांडे सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ च्या मंचावर येणार आहेत.
हास्यजत्रेतील विनोदवीरांना दाद देतानाच मराठीत काम करण्याची इच्छाही चंकी पांडे यांनी या मंचावर बोलून दाखवली. चंकी पांडेंची ही इच्छा त्यांच्या आगामी ‘विकून टाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चंकी ‘हास्यजत्राच्या मंचावर आले आहेत. हास्यजत्रेचा मंचावर चंकी पांडे यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली ती म्हणजे मराठी भाषा शिकण्याची. गेली बरीच वर्षे विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणाऱ्या चंकी पांडेंना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर चढाओढ सुरू आहे. या हास्यवीरांच्या गमती पाहून “मला मराठी शिकवा आणि ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त शामिल करून घ्या” असे उद्गारही चंकी पांडे यांनी काढले.
तेव्हा हास्यजत्रेत असणाऱ्या विनोदवीरांनी चंकी पांडे सोबत केलेली धमाल अनुभवायला नक्की पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा. बुध-गुरु रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.