Marathi News

बिग बॉस स्पेशल: सिध्दार्थ शुक्लाला मागे टाकत रश्मि देसाई बनली सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

 

बिग बॉस होस्ट सुपरस्टार सलमान खानमूळे बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची चांगली लोकप्रियता असते. त्यात यंदाचा तेरावा सिझन थोडा ‘तेढा’ ठेवण्यात आलाय. त्यातल्या सेलिब्रिटी स्पर्धकांमूळे, नव-नव्या नियमांमूळे आणि ट्विस्टमूळे यंदा हे पर्व पाहायला खूपच मजा येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाने बिग बॉस ,सिझन 13च्या स्पर्धकांची रँकिंग दिलेली आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकडेवारीनूसार, हिंदी टेलिव्हिजनची लोकप्रिय ‘बहु’ रश्मी देसाई सर्वाधिक लोकप्रिय आहे. हा शो लाँच होण्याअगोदर लोकप्रियतेत नंबर वन स्थानी असलेल्या एक्स-बॉयफ्रेंड सिध्दार्थ शुक्लाला मागे टाकून आता बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये रश्मी देसाई लोकप्रियतेत प्रथम क्रमांक पटकावून बिग बॉस-13 ची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक बनलीय. बिग बॉस लाँच होण्यावेळी सिद्धार्थ नंबर वन तर रश्मी दूस-या क्रमांकावर होती. आता रश्मी 100 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आणि सिध्दार्थ 80.39 गुणांसह दूस-या स्थानी आहे.

टेलिव्हिजन मालिकांमधली लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर 71.93 गुणांसह तिस-या स्थानावर तर पारस छाब्रा 71.64 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दलजीत ह्या शोमधून बाहेर पडल्यावरही तिची लोकप्रियता चांगली राहिली आहे. बॉलीवुड अभिनेत्री कोयना मित्रा 69.87 गुणांसह पांचव्या स्थानावर आहे. तर शेफाली बग्गा सहाव्या क्रमांकावर आहे.

बिग बॉसची सिझलिंग हॉट कंटेस्टंट माहिरा शर्मा 56.49  गुणांसह सातव्या स्थानावर आहे. टेलिव्हिजनचा लोकप्रिय लेखक सिद्धार्थ डे 52.14 गुणांसह आठव्या स्थानी आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेतला सर्वाधिक लोकप्रिय हास्यकलाकार आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची बहिण अभिनेत्री आरती सिंग बिग बॉसचा सिझन सुरू होताना चौथ्या स्थानावर होती. आता ती आंठव्या स्थानावर पोहोचलीय.

बिग बॉस शो लाँच होण्याअगोदर आणि आत्ताही शहनाज गिल दहाव्याच स्थानावर आहे.  मात्र देवोलिना भट्टाचार्यच्या लोकप्रियतेत घसरण झालेली दिसून येतेय. लॉन्चच्या अगोदर पाचव्या स्थानी असलेली देवोलिना आता अकराव्या स्थानी पोहोचलीय. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर पडलेले अबु मलिक बाराव्या स्थानावर आहेत. तर कश्मीरी मॉडेल असीम रियाज़ लोकप्रियतेत सर्वात शेवटी म्हणजे तेराव्या स्थानावर आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक, अश्वनी कौल म्हणाले, “सलमान खान हा निर्विवाद सुपरस्टार आहे. त्याचप्रमाणे तो करत असलेला बिग बॉस 13 हा शो आणि त्यातले स्पर्धकसुध्दा चांगलेच लोकप्रिय आहेत. शो सुरू होण्यापूर्वी आम्ही माध्यमांचे विश्लेषण केले. 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा संकलित केला. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.”

अश्वनी कौल पुढे सांगतात, “बिगबॉस सुरू झाल्यावरही आम्ही क्रमवारीची तपासणी केली. आणि त्यांच्या रँकिंगमध्ये आम्हाला बरीच तफावत आढळून आली. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही  सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button