Marathi News
मी बाथरूम सिंगर आहे – माधव देवचके
बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात असलेल्या कन्टेस्टंट अभिनेता माधव देवचकेला संगीतची विशष गोडी आहे. माधवला संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण न घेताही तो अनेकदा ताना आणि हरकती चांगल्या घेतो, असे त्याच्या जवळची लोकं म्हणतात.
बिगबॉसच्या घरात जाण्याअगोदर आपल्या गाण्याविषयीच्या आवडीविषयी माधव सांगतो, “मी प्रचंड फिल्मी आहे. त्यामुळे मी फिल्मीसंगीतावरच वाढलो. आयुष्यातल्या प्रत्येक सिच्युएशनवेळी मला साजेसे गाणे पटकन सुचते. किशोरकुमार हे माझे सर्वात आवडते गायक. त्यांची गाणी तर आपल्या प्रत्येक मुडसाठी आहेत.”
माधव आपल्या गायनाच्या आवडीविषयी सांगतो, “मी खरं तर बाथरूम सिंगर आहे. संगीताविषयीची आवड आहे. पण मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नाही. मी स्वत:ला गानसेन नाही, तर कानसेन म्हणेन.”