Marathi News

मैथिली जावकर ठरतेय सर्वाधिक ‘कुलेस्ट’ बिग बॉस कॉन्टेस्टंट

Maithili Javkar

 

बिग बॉसच्या घरात भांडण-तंटे होणं आता नवीन नाही.. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दूस-या पर्वातही आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच घरात आलेला प्रत्येक सदस्य कधी ना कधी दूस-या सदस्यावर आवाज चढवून बोललाय. याला फक्त एक अपवाद आहे. आणि ती म्हणजे अभिनेत्री मैथिली जावकर.

 

बिग बॉसच्या घरात आल्यापासून मैथिलीला भांडण तर सोडाच, पण एकदाही आवाज चढवून बोलताना, किंवा एखाद्या विषयी गॉसिप करतानाही पाहण्यात आलेलं नाही. म्हणूनच कदाचित मैथिलीच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरून सर्वाधिक कुलेस्ट कंटेस्टंट’ म्हटलेलं आहे.

 

काही प्रेक्षकांनी तर तिच्या शांतपणे खेळण्याचं कौतुक करताना किप काम आणि प्ले बिग बॉस (keep calm and play big boss) अशी शाबासकीही दिलेली आहे. मैथिलीच्या ह्या कुल स्वभावानेच तिच्याबाबत गैरसमज करून पहिल्या नॉमिनेशनवेळी काही सदस्यांनी तिला नॉमिनेट केले. पण मैथिलीला नशिबीची साथ मिळाल्याने ती नॉमिनेशनमधून सेफ झाली.

 

पहिल्या टास्कवेळीही मैथिली शांतपणे खेळताना दिसली. आणि हिच तिची जमेची बाजू असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. बाकी सदस्यांनी अभिजीत बिचुकले व्हिलनबनवल्यावरही मैथिलीने मात्र एकदाही त्याच्याविषयी अपशब्द वापरला नसल्याबद्दलही मैथिलीचे चाहते तिची पाठ थोपटत आहेत. आणि ती घराची पहिली कॅप्टन होण्यासाठीही पात्र असल्याचे म्हणत आहेत.

 

https://www.instagram.com/p/ByCatseADiV/?igshid=1x751mrdhuqw6

Related Articles

Leave a Reply

Back to top button