ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न!
एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात समीरपरांजपे आणि ‘आम्ही दोघे राजाराणी’ या मालिकेचा नायक पार्थ अर्थात मंदारकुलकर्णी सध्या एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाता आहेत. प्रेक्षकांच्यापसंतीस उतरलेल्या या दोन्ही नायकांची खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्न झालीअसून महिन्याभराच्या आत पुन्हा हे दोघे बोहल्यावर चढणार आहेत.
अर्थात या मागचे कारणही वेगळे आहे,या दोन्ही मालिकांच्या कथानकातल्यामोठ्या वळणानुसार या दोघांचीही ऑनस्क्रीन लग्न येत्या काही आठवड्यात होतआहेत. बयोआजी आणि तिचा नातू विलास या दोन व्यक्तीरेखा गोठ यामालिकेमुळे घराघरात पोहचल्या आहेत,बयोआजी सध्या विलासचे लग्नजुळवण्याच्या विचारात आहेत,बयोआजीच्या व्यक्तीमत्वानुसार त्या हाती घेतात तेकाम तडीस नेतात,त्यानुसार विलासचे लग्न कोणाशी होणार याची उत्सुकताप्रेक्षकांना आहे.
‘आम्ही दोघे राजाराणी’ मध्ये सध्या पार्थ नाईक आणि मधुरा लेले या जोडीचीअतरंगी कुटुंबांच्या कधी विरोधात तर कधी पाठिंब्यावर रंगणारी प्रेमकथानिर्णायक टप्प्यावर आहे. या दोघांच्या प्रेमाचे लग्नात होणारे रुपांतर हा धमालटप्पा पार्थ अर्थात मंदार कुलकर्णीच्या नुकत्याच झालेल्या लग्नाच्या अनुभवाने विशेष रंगताना दिसतो आहे. स्टार प्रवाहवरचा हा लग्नाचा सीझन प्रेक्षकांना दोनवेगळ्या धाटणीच्या लग्नांचा अनुभव देणारा आहे.