स्वातंत्र्य लढ्याची कथा सांगणारा “क्रिस्टो सिंग” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Singer Krishna Beura

आपल्या सिनेसृष्टीला स्वातंत्र्य लढ्याचे कायम आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्याचे संदर्भ देतानाच त्यावेळचा भारवलेला काळही रुपेरी पडद्यावर अत्यंत खुबीने उभारले जातात. अशा ऐतिहासिक चित्रपटांची अनेक उदाहरणं देत येतील. असाच एक हिंदी सिनेमा क्रिस्टो सिंग आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाची कथा ही बिहारचे स्वातंत्र्य सेनानी क्रिस्टो सिंग यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे.

बिहारच्या या स्वातंत्र्य सेनानीच आपल्या स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्वाचा वाटा आहे. क्रिस्टो सिंग यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यांच्या लढयाची गोष्ट आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त “वंदे मातरम” या गाण्याच्या रेकॉर्डिंगने एँंझी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी क्रिस्टो सिंग यांचे नातू ही उपस्थित होते.  

“चक दे इंडिया” या सिनेमातलं मौला मेरे हे गाणं गायलेल्या क्रिश्ना बेऊरा या गायकाच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. याप्रसंगी क्रिश्ना म्हणाले, “मौला मेरे या माझ्या गाण्याला लोकांनी खूप पसंती दिली. वन्दे मातरम हे गाणं जोशपूर्ण आहे. या गाण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणं देखील प्रेक्षकांना तेवढंच आवडेल, अशी मला खात्री आहे.  रिकी मिश्रा यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतो आहे. “

मावेन अँङ दावेन फिल्म्स या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून राजहंस कुंवर आणि अमित सिंग हे निर्माते आहेत. रिकी मिश्रा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची तसेच संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. वरदराज स्वामी यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असलेला क्रिस्टो सिंग हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version