Marathi News
सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत

महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेह-यावर हसू फुलवत असतो. पण ह्या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. नुकत्याच एका कार्यक्रमात सिध्दार्थने बी़डच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेह-यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे.
14 वर्षांपूर्वी सहारा अनाथलायाची स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणा-या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळं करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच सिध्दार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले.
अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “बीडच्या पाटसरा ह्या दुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात 85 निराधार मुलं आहेत. ह्या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापूढे फार छोटी होती.”
Leave a Reply
You must be logged in to post a comment.