Marathi NewsNews
सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर पोहोचल्या बॉलीवूडच्या मोस्ट हाइप्रोफाइल इफ्तार पार्टीला!
राजकीय नेते बाबा सिद्दीकी ह्यांची इफ्तार पार्टी ब़ॉलीवूड आणि पेज-थ्री सर्कलमध्ये दरवर्षी चर्चचा विषय ठरते. ह्या पार्टीचे आमंत्रण येणे हे बॉलीवूडसाठी स्टेटस सिम्बॉल असतो. फक्त सिलेक्टिव्ह सेलेब्सनाच ह्या पार्टीचे इन्व्हिटेशन मिळते. ह्या हायप्रोफाइल पार्टीचे आमंत्रण यंदा मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर ह्या दोन ए-लिस्टर्स अभिनेत्रींना मिळालं होतं.
बॉलीवूड सूत्रांनुसार, आजपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीला ह्या पार्टीचे आमंत्रण मिळाले नव्हते. सई आणि अमृताची ह्या शाही इफ्तार पार्टीच्या रेड कार्पेटवरची हजेरीच सांगून गेली की, आज त्या मराठीच नाही तर ब़ॉलीवूड सर्कलमध्ये किती लोकप्रिय आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे.