सई आणि तेजस्विनीला गवसला गाण्याचा सूर

Sai and Tejaswini’s
संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे सिनेमा प्रेमकथेवर आधारित असला त्यातील रोमॅंटिक इसेन्स हा तितकाच खास आणि प्रेक्षकांना आपलंस करणारा असतो. अशा सिनेमात मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित असं झकास त्रिकुट असल्यावर सिनेमा नक्कीच पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असेल. त्यातही सई आणि तेजस्विनीचं गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तेजस्विनीला आपण नांदी या संगीत नाटकातून गाताना ऐकलंच असेल पण सईने गाण्याचा हा पहिला वहिलाच प्रयत्न आहे.  त्यामुळे या दोघींना पहिल्यांदा गाताना पाहण्याचा अनुभव तू ही रे सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे. त्यांचा दमदार अभिनय मस्त अदाकारी आणि गाण्याचे तरल सूर प्रेक्षक येत्या ४ सप्टेबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या माध्यमातून अनुभवतील. तोळा तोळा या गाण्याचे ‘अनप्लग्ड वर्जन’ सई आणि तेजस्विनीने सिनेमात गायलं आहे.  याबाबत सई आणि तेजस्विनी खूप उत्सुक आहेत. सई म्हणते, गाणी मला ऐकायला गुणगुणायला आवडतात पण तसा प्रयत्न आपण कधी करू असं वाटलं नव्हतं. मला प्रयोगशील राहायला आवडतं. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला आहे. त्यासाठी मी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक अमितराज याची खूप मदत झाली. त्याने माझ्याकडून गाऊन घेतलं असंच मी म्हणेन. तेजस्विनीची ला सुरांशी तशी माहिती जवळीक असली सिनेमात गाण्याचा अनुभव नवखा असल्याचं ती सांगते, बऱ्याच जणासोबत गाण्यात आणि एकटं गाण्यात खूप फरक आहे. त्यामुळे गाताना मी कुठे अडतेय किंवा कोणत्या जागा मी चांगल्या घेऊ शकते याचा अंदाज मला आला. आता अभिनयासोबत गाणं देखील शिकायला हरकत नाही.  
Watch Video:

Images:

Sai Tamankar and Tejaswani pandit
Exit mobile version