संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे या सिनेमांनी प्रेक्षकांना अगदी भावूक केलं. या तिन्ही सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला एका वेगळ्याच दुनियेच दर्शन घडवून आणलं. संजय जाधव यांचा सिनेमा म्हटला की काही तरी वेगळं मिळणारच हे आत्ता प्रेक्षकांनी गृहितच धरल आहे. त्यांचा आगामी सिनेमा गुरु हा भावनिक जगाकडून वास्तवतेकडे नेणारा असा आहे. अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर या दोघांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात असणार आहेत. गुरु ठाकूर यांच्या शब्दांची तर अमितराज आणि पंकज पडघन यांच्या सुरेल संगीताची जादू आपल्याला याही सिनेमात ऐकायला मिळणार आहे. सिनेमाच्या कथेबाबत सध्या तरी गुप्तता पाळण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुरु’ सिनेमाच्या नावावरूनचं त्याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.