विजय आंदळकर मराठी सिनेसृष्टीतला नवा चेहरा

मराठी चित्रपट सृष्टीत बदल होत असताना अनेक नवे चेहरे आपले कलागुण सोबत घेऊन या चित्रनगरीत आपला जम बसवू पाहत आहेत. विजय आंदळकर हे त्यातलच एक नाव. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिआलिटी शो मधून विजयला खरी ओळख मिळाली. आपल्या फिल्मी करिअरची दमदार सुरुवात करणारा अभिनेता विजय आंदळकर ‘मि. एंड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात तो आपल्याला निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात तो एका श्रीमंत मुलाची भूमिका साकारत असून नेगेतीव्ह शेड असलेली ही व्यक्तिरेखा आहे.

विजय आणि वैभव तत्ववादी यांचे काही अॅक्शन सिक़्वेन्स देखील आहेत. साउथचे फाईट मास्टर शिवाजी राज यांच्या मार्गदर्शनाखाली विजय आणि वैभवचा फाईट सीन चित्रित केला आहे. मास्टरसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं असं विजय सांगतो. सुरुवातीला एकमेकांची भाषा समजत नसल्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, ती अडचण काहीवेळा पुरतीच होती. शिवाजी राज यांनी अगदी चांगल्यापद्धतीने आमच्याकडून फाईट सीन करून घेतले असल्याचे विजयने सांगितले. कोणत्याही प्रोक्सविना आणि सेफ्टीविना हा सीन चित्रित केला गेला असून, या फाईटसीन दरम्यान विजयला अनेक जखमादेखील झाल्या होत्या.

तब्बल आठ दिवस कोणत्याही डायलॉगशिवाय हा सीन आम्ही पूर्ण केला असल्याचे विजयने सांगितले. आतापर्यंत मराठी चित्रपटात अशाप्रकारची वन साईड रिअल फाईट कुठेच पाहायला मिळाली नसल्याचेही विजय सांगतो. ‘मि. एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमाच्या नित्मित्ताने आपल्याला डॅशिंग आणि हँडसम असा चार्मिंग हिरो मिळणार आहे. आशिष वाघ यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून इंडियन फिल्म्स स्टुडिओ या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या शिवजयंतीला म्हणजेच १९ फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version