Marathi Newsnewshunt
वामन केंद्रे यांनी केले ‘ड्राय डे’ सिनेमाचे कौतुक
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ड्राय डे’ सिनेमाचे नेशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी भरभरून कौतुक केले आहे. १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे जुहू येथे खास पाहुण्यांसाठी स्पेशल स्क्रीनिग आयोजित करण्यात आले होते. त्यादरम्यान मराठीचित्रपटसृष्टीतील चमकत्या सिनेतारकांच्या मांदियाळीत पार पडलेल्या या स्क्रीनिंगला त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मराठी रंगभूमीचे धनी आणि प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी ‘ड्राय डे’ सिनेमाचे दिग्दर्शक पांडूरंग जाधव यांचे विशेष कौतुक केले.वामन केंद्रे यांचा सुपुत्र रित्विक केंद्रे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून, ‘ड्राय डे’द्वारे तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. त्याबद्दल बोलताना वामन केंद्रे यांनी असे सांगितले कि, ‘ रित्विकने लहानपणापासून नाटकात काम केलं आहे, आणि आता तो या सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असल्यामुळे आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच कैलाश वाघमारे हा देखील माझाच विद्यार्थी असल्यामुळे, या सिनेमाला भरघोस यश मिळो, अशी मी प्रार्थना करतो’.