‘लव सोनिया’तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समूळे सईची होतेय बॉलीवूडमध्ये प्रशंसा!
‘लव सोनिया’ सिनेमा रिलीज झाल्यावर सध्या सर्वत्र अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रशंसा होत आहे. सिनेमात सई ताम्हणकर ‘अंजली’ ह्या लक्षवेधक भूमिकेत दिसली आहे. लव सोनिया पाहिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सध्या सईची प्रशंसा ऐकायला मिळत आहे.
बॉलीवूडमधल्या कॅटरीना कैफ, अनिल कपूर, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी लव सोनिया सिनेमा पाहिल्यावर सईचे भरभरून कौतूक केली. एवढेच नाही, तर अनेक बॉलीवूड ट्रेडपंडित आणि समीक्षकांनीही सिनेमा पाहिल्यावर सईची वाखाणणी केली आहे.
सूत्रांच्या अनूसार, ‘लव सोनिया’ सिनेमातला सईचा सहज वावर, आत्मविश्वास, बॉलीवूड चाहत्यांची मनं जिंकून गेला. सईने गजनी, ब्लॅक एन्ड व्हाइट, हंटर, सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यावर लव सोनिया ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात फ्रिडा पिंटो, डेमी मोर सारखे कलाकार असताना आपल्या अभिनयाची छाप बॉलीवूडकरांवर सोडणं, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘लव सोनिया’मूळे सईने बॉलीवूडलाच नाही, तर वल्डसिनेमा पाहणा-या प्रेक्षकांनाही आपण एक सशक्त अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलंय.
फेमिनाच्या कवर पेजवर आलेली आणि सॅवी हा नामांकित पुरस्कार प्राप्त असलेली पहिली मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर जेव्हा लव सोनियासारखा आंतरराष्ट्रीय सिनेमा करून ब़ॉलूवबडकरांचं लक्ष वेधून घेते, तेव्हा निश्चितच मराठी मन उंचावतात.