Marathi News

लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन

love sonia

 

तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया सिनेमामध्ये सई ताम्हणकर अंजली ह्या देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बाईच्या भूमिकेत आहे. ह्या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सईला खूप मानसिक ताण आला होता. ती ही भूमिका रंगवताना ब-याचदा फ्रस्ट्रेट झाली आहे.

सई ताम्हणकर म्हणते, “ह्या सिनेमामूळे देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायकांच्या व्यथा मला ख-या अर्थाने कळल्या. इथे पकडून आणलेल्या लहानमुलांना कसं गुलाम बनवलं जाते, ते कळले. त्यांना छोट्या पिंज-यात दोन-दोन दिवस अन्न-पाण्याविना बंद करून ठेवतात. हे सगळं अंगावर येणारं. प्रचंड मानसिक वेदना देणारं होतं.”

सई पूढे सांगते, “लव सोनियातली अंजली मुली पूरवण्याचं काम करते. ती सतत नकारात्मक वातावरणातच राहते. त्याचा अर्थातच कळत-नकळत माझ्याही मनावर परिणाम झाला. मला ही भूमिका रंगतवाताना खूप फ्रस्टेशन यायचे. माणसं एवढी कशी वाईट असू शकतात?  मी एखाद्या व्यक्तिशी किती वाईट वागतेय? असं वाटायच”

ह्या फ्रस्टेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी सईने म्युझिक थेरपीचा आधार घेतला. ती म्हणते, “संगीत एक खूप चांगले औषध आहे. आनंददायी संगीत तुम्हांला मानसिक ताणातून बाहेर आणायला. खूप मदत करतं.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button