Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अ डॉट कॉम मॉमचे साँग लाँच अ डॉट कॉम मॉम 30 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

Dot Com Mom

जगात सगळ्यात महत्त्वाचं नातं मानलं जात ते आई – मुलाचं…या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो… असतो तो फक्त भावनिक बंध. मुलाची प्रत्येक चूक पोटात घालून मायेनं जवळ करणारी ती आईच असते. आई मुलाच्या या भावनिक बंधाची गोष्ट सांगणारा “अ डॉट कॉम मॉम”…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या गाण्यांचा ऑडियो लाँच केला. यावेळी बोलताना, हा चित्रपट अमेरिकेत चित्रित झालेला पहिला चित्रपट आहे…आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी अ डॉट कॉम मॉम चित्रपटाच्या दिग्दर्शिका डॉ. मीना नेरूरकर यांनी स्वत: लिहिलेले, स्त्रियांचे अनुभव सांगणारे पुस्तक ‘धन्य ती गायनॅक कला’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नींना सप्रेम भेट केले. मुख्यमंत्र्यासह गृहमंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपटात या साध्या भोळ्या अ डॉट कॉम मॉम चा तितकाच साधा सरळ मुलगा झालेला साई गुंडेवार ही अनावरणावेळी उपस्थित होता.

अवघा रंग एकचि झाला आणि सुंदरा मनामध्ये भरली यांसारखी दर्जेदार नाटके प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर यांचा अ डॉट कॉम मॉम हा चित्रपट दिग्दर्शनात पहिलाच चित्रपट… नाट्यसृष्टीबरोबरच डॉ. मीना नेरूरकर हे नाव साहित्य क्षेत्रातही तितकेच गाजलेले आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकासाठी लिखाण केले आहे. तर ‘धन्य ती गायनॅक कला’ आणि ‘ठसे माणसांचे’ यांसारखी पुस्तकेही लिहिली.

कायान प्रोडक्शन बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच डॉ. मीना नेरूरकर यांनी या चित्रपटासाठी संवाद लेखन, गीतं लेखन आणि कोरिओग्राफी केली असून… अ डॉट कॉम मॉमच्या भूमिकेत त्या स्वत: दिसणार आहेत. जीसिम्सचे अर्जुनसिंग बर्हान आणि कार्तिक निशानदार हा चित्रपट प्रेझेंट करत आहेत. या अ डॉट कॉम मॉम मधील मध्यमवर्गीय आईचे अमेरिकन रूप येत्या 30 सप्टेंबरला आपल्यासमोर येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button