माझा संकल्प ; पाणी बचत आणि स्वच्छ परिसर
न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो त्या होतातच असं नाही. त्यामुळे रिजोल्यूशन पेक्षा मी संकल्प टप्पा टप्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परीस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. येत्या नवीन वर्षात माझा पहिल्यांदा एखादा सिनेमा प्रदर्शित होतोय त्यामुळे मी जास्त २०१६ वर्षाची आतुरतेने वाट बघतेय. १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा शासन सिनेमा आणि १८ जानेवारी माझा वाढदिवस अशा दोन्ही महत्वाच्या गोष्टी या वर्षात आल्यामुळे हे वर्ष मझ्यासाठी खूप स्पेशल आहे. गजेंद्र आहिरे दिग्दर्शित शासन सिनेमातील माझी भुमिका वेगळी असून आव्हानात्मक आहे. त्यात प्रेक्षकांना मी एक नर्तिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून पाहायला मिळेल.
नर्तिका, अभिनेत्री – अदिती भागवत
******************************
हे नवीन वर्ष मला ट्वीन फन देणार
नवीन वर्ष माझ्यासाठी नेहमीच उत्साह आणि आनंद घेऊन येणारा असतो. येत्या वर्षात हाच उत्साह २०१६ मध्ये दिव्गुणीत झाला आहे. प्रत्येक वर्ष माझ्यासाठी नवीन संकल्पनेचा असतो. माझे मन मला नेहमीच काहीतरी नवीन करायला प्रवृत्त करत असते आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न देखील करते. येत्या वर्षात मी माझी म्युझिक अकॅडमी सुरु करण्याचा विचार करत आहे तसच चॅरिटी दवाखाना सुरु करणार आहे जेणेकरून माझा मेडिकलचा अभ्यास सुरु राहील. येत्या २०१६ मध्ये नेहा राजपाल प्रॉडक्शन निर्मित ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे, या सिनेमाला घवघवीत यश मिळेल ही आशा करते. १ जानेवारीला माझ्या लग्नाचा वाढदिवस देखील असतो, दरवर्षी मी आणि आकाश दोघे कुठेतरी लांब जाण्याचा प्लान करतो पण यंदा फोटोकॉपीच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु असल्यामुळे या वर्षी आम्ही मुंबईत आहोत. या वर्षीचा डमल धमाका मी प्रेक्षकांसोबत अनुभवणार आहे.
गयिका – नेहा राजपाल
******************************
२०१५ वर्ष खूप लकी गेलं २०१६ ची आतुरतेने वाट बघतेय
गेली काही वर्ष मी इंडस्ट्री मध्ये करतेय. माझ्या करियरमध्ये योग्य संधी आणि वेळ उत्तम जुळून आली. ज्यामुळे मी करत असलेल्या मेहनतीचं रुपांतर प्रगतीत होत गेलं. २०१५ वर्षात घडत गेलेल्या घडामोडी त्याचं उत्तम उदाहरण आहे.त्यामुळेच मी २०१६ ची आतुरतेने वाट पाहतेय. न्यू इअर रिजोल्यूशन करत नाही तर प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं पसंत करते. ज्यात येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १० गोष्टी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर होत काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येत नेमकी मेहनत कुठे करायची आहे ते. माझ्या मते न्यू इअर रिजोल्यूशनचा उद्देश्य देखील हाच असतो. २०१५ माझ्यासाठी खूप लक्की गेले, कारण या वर्षीच्या ‘मितवा’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमामुळे मला ख-या अर्थाने लोक ओळखू लागले, आता माझी हि दरमजल आगामी वर्षात येणाऱ्या ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून पुढे सुरु होणार आहे. या सिनेमातून माझा अभिनय प्रेक्षकांना अजून आवडेल अशी मी आशा करते. ५ जानेवारीला असणारा माझा वाढदिवस नेहमीच माझी नवीन वर्षाची सुरवात स्पेशल करते. त्यामुळे नवीन वर्षासाठी मी नेहमीच एक्साईट असते.
अभिनेत्री – प्रार्थना बेहरे ******************************
संकल्प जास्तीत जास्त काम करण्याचा
न्यू ईयर रिजोल्यूशन पेक्षा नव्या वर्षाचे प्लेनिंग करण्यात मी जास्त विश्वास ठेवते . आता माझे जे शोज होत आहेत ते पुढच्या वर्षी देखील सुरु राहणार आहेत, या शोजमधून अधिक जोमाने काम करण्याचा माझा मानस आहे. नुकताच माझा नचिकेत आणि गुरु ठाकूर सोबत कुवेत मध्ये एक यशस्वी कार्यक्रम झाला आहे. तसेच नवीन वर्षात माझे काही आगामी प्रोजेक्ट देखील आहेत, आम्ही एप्रिल महिन्यात एमस्टरडॅम मध्ये युरोपियन मराठी संमेलनात कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षातील हा माझा मोठा प्रोजेक्ट असणार आहे, शिवाय २०१६ ला माझा अपकमिंग मुंबई टाईम सिनेमा देखील येत आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तो प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक आहे. त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच आगामी वर्षातील काही सिनेमांचेदेखील मी संगीत दिग्दर्शन करणार आहे.
गायिका – योगिता चितळे
******************************
कामाबरोबरच तब्येत ही जपणार
नवीन वर्ष माझ्यासाठी खूप बीजी असणार आहे. २०१६ मध्ये माझे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत, त्यातील एक ‘वृंदावन’ सिनेमा जो ५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय. एक अभिनेत्री म्हणून माझा अभिनय अधिक सकस आणि प्रभावशाली होईल याकडे लक्ष देणार आहे. तसेच नवीन वर्षात मी काही सिनेमे देखील साइन केले आहेत, त्यामुळे येत्या वर्षात मला भरपूर काम असून त्यासाठी माझी खूप धावपळ होणार आहे, म्हणूनच कामाबरोबरच मी माझ्या तब्येतीकडे देखील जास्त लक्ष देणार आहे, माझ्या कामाचा ताण माझ्या आरोग्यावर पडू न देण्याचा माझा संकल्प असणार आहे.
अभिनेत्री- पूजा सावंत
******************************
रिजोल्यूशन पेक्षा छोटी गोल्स करणं पसंत करते
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहात आपण रिजोल्यूशन करतो आणि काही कारणास्तव ती बारगळतात देखील त्यामुळे मला असं वाटतं त्यापेक्षा वर्षभरात आपण छोटी छोटी गोल्स करावी जी आपण पूर्ण करु शकू. मी तर हाच फंडा फॉलो करते. येत्या वर्षातील एक महत्वाचं गोल म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे. २०१६ मध्ये माझे काही सिनेमे रिलीज होतायत काही सिनेमाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे खूप धावपळ हि ओघाने आलीच म्हणून मी फिटनेस आणि फिजिकल स्ट्रेन्थकडे अधिक लक्ष्य देणार आहे. ‘बंध नायलॉनचे’ हा येत्या वर्षात रिलीज होतोय तर एका हिंदी सिनेमाचं चित्रीकरण देखील सुरु केलंय.
अभिनेत्री – श्रुती मराठे
******************************
स्वच्छ परिसर सुंदर देश’ मोहिमेसाठी स्वतः प्रयत्न करेन
नवीन वर्ष म्हंटले तर संकल्पाना उधान येतंच. मी देखील येणा-या प्रत्येकवर्षी वेगवेगळे संकल्प करते, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. यावेळी मी ‘स्वच्छ परीसर सुंदर देश’ ही मोहीम राबवणार असून माझ्या अवतीभोवतालच्या लोकांनाही तसे करण्यास मी प्रवृत्त करणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रत्येकाला एकजुटीने काम करायला हवे, आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकांनी आपापल्या घरातून सुरवात करायला हवी, असे मला वाटते. शिवाय येत्या नवीन वर्षातील मराठी आणि हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील माझ्या प्रोजेक्टवर देखील मी लक्षकेंद्रित करणार आहे. तसेच ‘स्टे फिट, स्टे हेल्दी’ हा माझा नेहमीचा फंडा मी आगामी वर्षीदेखील सुरु ठेवणार आहे.
अभिनेत्री- रीना वळसंगकर – अगरवाल
******************************
पुढील वर्षाची सुरवात प्रेस्टीजीयस जर्नीने सुरु होणार
२०१६ वर्षाच्या सुरवातीला २२ जानेवारी रोजी गुरु सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या माध्यमातून माझी प्रेस्तीजीयस जर्नी सुरु होईल. त्यामुळे वर्षाची सुरवात खूप स्पेशल होणार आहे. त्याचबरोबर कटाक्षाने काळजी घेईन की पाण्याचा अपव्यय होणार नाही. मी आणि आदिनाथ काही कामानिमित्त मराठवाड्यात गेलो असताना तिकडे दुष्काळाची परिस्थिती पहिली आणि धक्काच बसला. म्हणूनच मी व्यक्तीकरित्या संकल्प केलाय शक्य होईल तितकी पाण्याची बचत करायची.
अभिनेत्री – उर्मिला कानेटकर – कोठारे