संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे.
खर तर, साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरोइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवे नाही. मात्र मराठी फिल्म हिरोइनही अशा साइज झिरो, सेक्सी अंदाजात दिसणे हे नवीन आहे. थोडक्यात लकी सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता साइज झिरो हिरोइन मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
सूत्रांनूसार, फिल्ममेकर संजय जाधव ह्यांच्या दिप्ती पहली हिरोइन असेल, जी बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या हिरोइन्स त्यांच्या सिनेमांमध्ये खूप सुंदर आणि सेक्सी दिसल्या आहेत. मात्र संजय जाधवांच्या सिनेमातल्या हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. लकीच्या अगोदर साउथ सिनेमामध्ये दिसलेल्या दिप्तीसाठीही बिकिनी घालण्याची ही पहिली वेळ आहे. ह्याअगोदर तिनेही कधीच बिकिनी घातली नव्हती.
ह्याविषयी विचारल्यावर दीप्ती म्हणाली, “मला जेव्हा सिनेमात बिकिनी घालायची आहे, असं समजलं तेव्हा खरं तर मी थोडी नर्व्हस झाले होते. मात्र हा सिक्वेन्स चित्रपटाला कलाटणी देणारा ठरणार आहे, हे उमगल्यावर मी तयार झाले. संजयदादांनी सीन खूप एस्थेटेकली चित्रीत केलाय. मी कम्फर्टेबल असावे म्हणून दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि माझे हेअर-मेकअप आर्टिस्ट ह्यांच्याशिवाय त्यावेळी सेटवर कोणीही नव्हते.”
दीप्ती पूढे म्हणते, “ ही फिल्म कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. कॉलेजविश्व, आणि आजच्या तरूणाईविषयीची फिल्म आहे. त्यामूळे बिकनी घालणं हा ह्या कथेतला एक भाग आहे. जसे आपण जिममध्ये जाताना स्पोर्ट्सवेयर घालतो. किवा कॉलेजमध्ये जाताना जिन्स-टीशर्टमध्ये असतो. तसेच स्विमींगपूलमध्ये टू पीस बिकनी घालतात. म्हणूनच बिकिनी सिनेमामध्ये दिसेल.”
बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.