Marathi News

मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार ‘विकता का उत्तर?

vku-ep-19-3

स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो ‘विकता का उत्तर’ ला ‘महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. ‘विकताका उत्तर?’ च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीपिका दुसाने  यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे.

यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे.  डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले  तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button