आई आणि मुलीच्या नात्याचे विविध पैलू मांडणाऱ्या आगामी ‘बोगदा’ सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँँच करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.
मायलेकीच्या नात्यामधला भावबंध मांडणारा हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ”व्हीस्लिंग वूड’ च्या शिलेदारांच्या मेहनतीतून साकार झालेल्या या ‘बोगदा’ चित्रपटाचे नितीन केणी प्रस्तुतकर्ते असून, दिग्दर्शिका निशिता केणीसोबत करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद या तिकडींनी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.