Marathi News

बेछूट शिव्यांचा गोळीबार करणारा ‘बंदूक्या’- १ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार

Bandookya
Bandookya

“काय गं डंगरे, कशाला नाचतीस?….तुझ्या आईच्या वरातीत नाचती”; अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेशुमार शिव्यांच्या धडाका असलेला बंदूक्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बंदूक्या’ सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना याचा अनुभव नक्की घ्यायला आवडेल. अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा एक अविभाज्य आणि संरक्षक घटक असल्याने बंदूक्या हा  वेगळ्या धाटणीचा तसेच  मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटी बाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल यात शंका नाही. बंदूक्या‘ हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं प्रमोशन आणि मार्केटिंग सीबा पीआर आणि मार्केटिंग सांभाळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button