तो तरुण आहे. तो सुसंस्कृत आहे. तो प्रतिभावान आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या नसानसांत संगीत भिनलेलं आहे असा, संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा सुपुत्र अवीतेश श्रीवास्तव उर्फ अवी ‘मैं हुआ तेरा’ ह्या आपल्या पहिल्या-वहिल्या गाण्याद्वारे गायक-संगीतकार-कलाकार म्हणून जागतिक संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ज्योर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गाणे, आणि रेमो डी’सुझा यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हिडीओचे अनावरण जगविख्यात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते कोर्टयार्ड बाय मॅरीएट, अंधेरी येथे करण्यात आले.
लॉस एंजल्समधील हॉलीवूड अकादमीचा विद्यार्थी, अवी याने शुजीत सरकारच्या ‘पिकू’ व ‘रंगून’ चित्रपटात विशाल भारद्वाजला सहकार्य करुन आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘जिंदगी’ चित्रपटाचे ‘आज की बात है’ हे शीर्षक गीत फक्त संगीतबद्धच केले नाही, तर ‘वन फॉर द वर्ल्ड’ मधे एकॉन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत ‘प्रदर्शन’ देखील केले असून ग्लोबल साउंड ऑफ पीस या अल्बम शिवाय टी-पेन व फ्रेंच मोंटान सह संगीत कला सादर केलेली आहे.
“हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. माझे वडील या दिवसाची खूप वाट पाहत होते.” भावनिक झालेला अवितेश आपल्या गोंडस चेहऱ्यामुळे मिळणाऱ्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स बद्दल सांगताना म्हणतो की, . “आम्ही अद्याप त्यांचा विचार करीत आहोत. मी माझ्या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून योग्य ब्रेक शोधत आहे, म्हणून मी माझा वेळ घेतो आहे. “
यापुढे पुरस्कार विजेते संगीतकार तसेच वाद्य प्रतिभा असलेले आंतरराष्ट्रीय एकल यांच्या सह काम करण्याकडे कल ओढवत “मी या क्षणी इतर कलाकारांना प्लेबॅक देण्याकडे पाहत नाही” हे तो कबूल करतो.