Marathi News
प्रीती झांगियानी, परवीन दबास, मुकेश ऋषी, परवेझ दमानिया यांनी केले आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ चे उदघाटन !
भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे 200 कलाकारांच्या 3000 कलाकृतींच्या ‘आर्टिव्हल २०१८’ या कला प्रदर्शनाचे अनावरण अभिनेता मुकेश ऋषि, परवीन दबास आणि पुष्कर लॉज या आगामी चित्रपटाची अभिनेत्री प्रीती झांगियानी, दिग्दर्शक विजय सुतार, निर्माते इंदर सुतार, एचआर गुरू सुजीत पाटकर, मांजू लोढा आणि परवेझ दमानिया यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ मध्ये भारताच्या विविध भागातील भाग घेणाऱ्या कलाकारांमध्ये टी. वैकुंठम, बी प्रभा, जमिनी रॉय, सुहास रॉय, गणेश पायने, रमेश गोरजाला, अजय डे आणि सीमा कोहली अशा अनेक कलाकारांचा प्रामुख्याने समावेश आहे.सतीश बी पाटील, शरद गुरव आणि सायप्रसंद जान यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, कला संग्राहक, संभाव्य खरेदीदार आणि कला संरक्षकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणारा आहे.
‘आर्टिव्हल २०१८’, २३ नोव्हेंबर – २५ नोव्हेंबर २०१८ रोजी दररोज सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेडमध्ये एक्सपो सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे.