प्रियांका म्हणते ‘या रे या’ व्हेंटिलेटरचे पहिले साँग लाँच

श्रीगणेशाच्या आगमनाची चाहूल अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. सगळीकडेच गणरायाची आरास सजली आहे. अशातच प्रियांका चोप्राने तिच्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटातील एक खास गाणे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केले आहे. हे जग डिजीटल होत चालले आहे. या डिजीटल युगाचा पुरेपूर फायदा घेत “या रे या, सा रे या, गजाननाला आळवूया…” अशी आरास प्रियांकाने ट्विटरवर सजवली आहे. राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्यानंतर मी या चित्रपटासाठी फार उत्साही असल्याचे प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे सांगितले होते. आता याच ट्विटरच्या माध्यमातून तिने या चित्रपटाचे पहिले गाणे लाँच केले आहे.
तर “गणेशोत्सवादरम्यान गजाननाला आळवताना माझे बाबा आणि काकांच्या तोंडून या रे या, सा रे या हे गाणे मी नेहमी ऐकले आहे. श्रीवर्धनमध्ये साजरा केलेला तोच काळ या गाण्यामुळे नजरेसमोर उभा राहिल्याचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटले आहे. या गाण्याचा मुखडा माझे काका शांताराम मापुसकर यांनी लिहिला असून मनोज यादव याने गाण्याचा अंतरा लिहिला आहे. ‘माझ्या काकांनी लिहिलेल्या शब्दांना रोहन – रोहन या जोडीने दिलेल्या संगीतामुळे या गाण्याची शोभा अधिक वाढल्याचेही,’ ते म्हणाले
Leave a Reply
You must be logged in to post a comment.