तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आला ‘फिल्ममेकर बालगणेशा

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेले एक दशक आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ह्या गुलाबाच्या कळीचे टॅलेंट फक्त अभिनयापूरतेच मर्यादित नाही. ती चांगली डिझाइनरही आहे. आणि एक सुंदर चित्रकारही आहे.

तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आलेले एक बालगणेशाचे चित्र सध्या गणेशोत्सवामध्ये सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ह्या बालगणेशाच्या हावभावातून तो फिल्ममेकर गणेशा असल्याचं प्रतित होत आहे.

तेजस्विनी पंडितच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तेजस्विनी पंडितमध्ये एक अष्टपैलू कलाकार दडलेली आहे. फिल्मइंडस्ट्रीतल्या तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना तिच्यातले हे वैविध्य वेळोवेळी दिसत असते. तेजस्विनी जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती उत्तम अभिनेत्री, डिझाइनर आणि चित्रकारही आहे. चित्रकलेचे कुठलेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न घेताही ती एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टसारखी चांगली चित्र रेखाटते.

आता ‘गुलाबाची कळी’ तेजस्विनीच्या चाहत्यांना नक्कीच तेजस्विनीच्या अशा एकाहून एक उत्तमोत्तम चित्र पाहण्याची इच्छा आहे.

Exit mobile version