Marathi News

झी युवा वाहिनीवर “शौर्य – गाथा अभिमानाची … महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची … Zee Yuva launching New Non fiction TV Show on Police bravery “Shaurya” – Gaatha Abhimaanach

shaurya-logo-presented-by-ck-opt-1

शौर्य म्हणजे असाधारण वीरता, शौर्य म्हणजे जाज्वल्य अभिमान, शौर्य म्हणजे अफाट शूरता, आणि म्हणूनच शौर्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलिसांची महिती खूप मोठी आहे आणि ती एवढ्या मोजक्या शब्दात वर्णन करता येणार नाही. खरे पाहता वर्षोनुवर्षं पोलिस आपले रक्षण करताना अफाट कष्ट घेतात पण आपल्याला ते कधीच दिसत नाहीत. त्यामुळे एकदा आपल्यालाच, पोलिसांच्या मनात शिरून त्यांची होणारी दयनीय अवस्था पाहिली पाहिजे. दहीहंडी, गणेशोत्सव यामध्ये बंदोबस्त करत असतानाचा प्रचंड तणाव, अपुरी विश्रांती, अपुरी झोप, सलग १२–१२ तास काम, सुट्ट्यांची वानवा यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचारी आधीच प्रचंड शारीरिक आणि मानसिक तणावाखाली दडपलेले असतात. एकही सणाचा दिवस पोलिसांना त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवता येत नाही. तुटपुंजा पगार, राहायला असलेल्या घरांची दयनीय अवस्था, कामाचे भेदक वास्तव असे सर्व असले तरीही “सदरक्षणाय खलनिग्रहणाय “या एका शपथेवर महाराष्ट पोलिसांनी, आपलं संपूर्ण आयुष्य हे देश सेवेसाठी वाहीलेले आहे.  ही यंत्रणा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी २४ तास, प्रत्येक परिस्थितीत कार्यरत असते. अश्या परिस्थितीतही, कित्येक अशक्य वाटणाऱ्या केसेस याच महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्या बुद्धी चातुर्याने, योग्य नियोजनाने, कुशलतेने आणि अतुल्य शौर्याने सोडवल्या आहेत. पण अश्याही अनेक घटना आहेत ज्या आजपर्यंत योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत. आणि त्या योग्य प्रकारे, योग्य व्यक्तीद्वारे आणि योग्य पद्धतीने पोहचवणे खूप महत्वाचे आहे.

झी युवा ही नवीन मराठी वाहिनी, आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन, अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम प्रेक्षकांना देत आहे. याच यशस्वी मार्गावर चालत, झी युवा “शौर्य – गाथा अभिमानाची ” या मालिकेद्वारे, सर्वच   प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, पुन्हा एकदा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जाणार आहे. या मालिकांमध्ये हाताळलेले संवेदनशील विषय, सामान्य नागरिकांच्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे करण्यासाठी, आता त्या घटनांचे खरेखुरे साक्षीदारच, त्या घटना तेव्हा कश्या घडल्या? तेव्हाची नाजूक परिस्थिति कशी होती?  तेव्हाच्या पोलीस अधिकाऱयांची मानसिकता काय होती?…

या आणि अश्या अनेक गोष्टींची गाथा अत्यंत अभिमानाने झी युवावर सांगतील. या कार्यक्रमाच्या निर्मितीबाबत बोलताना झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले कि “महाराष्ट्र पोलीस गेली कित्येक वर्ष प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीशी सामना देत उत्कृष्टरित्या कायद्याचे रक्षण करीत आहेत. विविध प्रकारच्या केसेस सोडवताना मीडियाच होणारं सततच प्रेशर, कामाच्या प्रेशरमुळे फॅमिलीला न देता येणारा वेळ, त्यात लोकांच्या अपेक्षांचे असह्य होणारे ओझे हे पोलिसांना भंडावून सोडते. पण तरीही अनेक अडचणींना, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तोंड देत महाराष्ट्र् पोलीस धैर्याने उभा आहे आणि गुन्हेगारीशी शौर्याने लढतही आहे. अश्या धाडशी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्यगाथा लोकांसमोर आणि मुख्यतः आजच्या पिढीसमोर येणं खरंच महत्वाचं आहे. हे शौर्य लोकांकडून नावाजलं जाणं महत्वाचं आहे. झी युवा, अश्या धाडशी महाराष्ट्र पोलिसांना सलाम करते आणि त्यांना गौरवण्यासाठीच “शौर्य – गाथा अभिमानाची ” हा कार्यक्रम सादर करीत आहे.”

विसरायचं जरी म्हंटल तरीही आपल्या मनावर आघात करणाऱ्या अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या केसेस आहेत – केस २६ नोव्हेंबर आणि मन्या सुर्वे एन्काऊंटर, यावेळी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचे दाखवलेले शौर्य, केस चार्ल्स शोभराज, ज्यात पोलीस अधिकारी मधुकर झेंडेच शौर्य, केस १९९३ बॉम्बस्फोट – टायगर मेमन, ज्यात पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचे शौर्य, पहिल्या महिला डिटेक्शन अधिकारी हिरेमठ मॅडम यांची गुन्हेगारी विरोधातील कारकीर्द हे शौर्य खरंच उल्लेखनीय आहे.गुन्हेगारी विश्वाने अख्खा महाराष्ट्र हादरवला पण तेव्हाही सांभाळला तो महाराष्ट्र पोलिसांनीच. या आणि अश्या अनेक शौर्य गाथा झी युवावर प्रेक्षकांना, पोलिसांच्या नजरेतून पुन्हा जगायला मिळतील.
>
> “शौर्य – गाथा अभिमानाची ” या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक –  जास्वन्द एंटरटेनमेंट चे  सचिन मोहिते  , तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे , कलादिग्दर्शक  विवेक देशपांडे , छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे .शौर्य – गाथा अभिमानाची या कार्यक्रमाबद्दल आणखी माहिती करिता आपण झी युवा च्या फेसबुक पेज आणि ट्विटर प्रोफाइल ला विझिट करू शकता

Related Articles

Leave a Reply

Back to top button