मुंबई : 2 वर्षाच्या चिंटूपासून ते 80 वर्षांच्या गोडबोले आजींपर्यंत सगळ्यांनाचं सेल्फीवेडानं झपाटलयं, हे काही वेगळं सांगायला नको…श्रीमंत-गरीब, नेता ते अभिनेता अशा सगळ्याचं वर्गवारींमध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे आपली सगळ्यांचीचं लाडकी ‘सेल्फी’… आता या यादीत पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झालेत. याची भूमिका बजावली आहे ‘जितेंद्र जोशी’ यांनी… वायकॉंम18 मोशन पिक्चर्स निर्मित ‘पोश्टर गर्ल’मध्ये मराठी मनावर स्वार जितेंद्र जोशी या सेल्फीवेडा पुढे पार हात टेकताना दिसतोयं.
आपल्या पोश्टर गर्लच्या स्वयंवरासाठीचे हे पहिले उमेदवार….शेतकरी ते विकासक व्हाया उपसरपंच असं पावरबाज व्यक्तीमत्त्व…जे पार खुळं झालयं…दोन गोष्टींच्या मागे…एकतर आपली ‘सेल्फी’ आणि दुसरी म्हणजे आपली ‘पोश्टर गर्ल’…
या सेल्फीवेड्या जितूला दिग्दर्शित केले आहे दिग्दर्शक समीर पाटील यांनी…तर या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे क्षितीज पटवर्धन यांनी…क्षितीज च्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे.
तर अशा या सेल्फीदिवाण्या जितूला नक्की भेटा, 12 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…