स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे.
या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे.संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे. .